ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणारे वृद्ध, दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यात्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच वाटप करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दिव्यांग नागरिकांसाठी जिल्हास्तरीय दिव्यांग सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी रमेश अवचार, हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दिव्यांगांना तात्काळ सेवा द्या राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बँकांमधून दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबियांना रांगेत न थांबविता तात्काळ सेवा द्यावी . दिव्यांग व्यक्तीस आरोग्य विषयक सेवा आवश्यक असल्यास सर्व आरोग्य विभाग व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत शासकीय /निमशासकीय संस्थांकडून शारिरीक दुर्बलतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या दिव्यांग व्यक्तींची काळजी घेण्याबाबत सूचना त्यांनी केल्या. दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी पुढील महिन्याची पेन्शन डव्हान्स मिळण्यासाठी संबंधित विभागास सूचित करण्यात यावे असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सोनवणे यांनी समाजकल्याण विभागाला दिले.
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग सहाय्य कक्ष स्थापन