सामान्य पलियाका संपूर्ण जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार बनलेले ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आता फक्त कोरोना हॉस्पिटल बनणार आहे. या रुग्णालयात उद्या रविवार पासून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान सध्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये ७ पॉझिटिव्ह रुग्ण असून चौदा संशयितांवर देखील उपचार सुरू आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होणार असल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार आहे. ठाण्यात सध्या पंधराहन अधिक कोरोना बाधित रुग्ण असून अनेक जण होम कोरोन्टीन आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. दरम्यान कल्याण, डोंबिवली अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड या भागातील कोरोना बाधित रुग्णांवर आता ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. आवश्यक असलेली सर्व यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून अन्य रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला .
ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय बनणार कोरोना हॉस्पिटल