_ मुंबई: वाढदिवसाचा खर्च टाळून करोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत योगदान देणाऱ्या सोलापूरमधील सात वर्षांच्या आराध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर कौतुक केलं आहे. 'सात वर्षांच्या मुलीनं दाखवलेली ही समज म्हणजे आपण करोनाविरुद्ध युद्ध जिंकल्याचं द्योतक आहे,' असंही मुख्यमंत्री म्हणाले. __करोनाची साथ आणि लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्यातील जनतेशी सोशल मीडियातून संवाद साधत आहेत. जनतेला विश्वास देतानाच अनेक गोष्टींची माहितीही देत आहेत. आज त्यांनी राज्यातील जनतेकडून होणाऱ्या मदतीची माहिती दिली. त्यात विशेषकरून त्यांनी सोलापूरच्या आराध्याचा उल्लेख केला.
म्हणून मुख्यमंत्र्यांनी मानले चिमुकल्या आराध्याचे आभार